महत्त्वाच्या बातम्या

मा. ना. शंभूराज देसाई साहेबांचा नावडी येथे गावभेट दौरा संपन्न

मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज नावडी येथे भेट देऊन उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, नावडी गावाने आम्हाला नेहमीच साथ दिली आहे. यावेळी विकासकामांना प्राधान्य देत मतदान करायचे आहे. त्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज आहे. येथून सर्वाधिक मतदान कसे होईल याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी केले. 

      यावेळी विभागातील शिवसैनिक, युवासैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीतील घटक पक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्यासह मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!