मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या पुढाकारातून पाटण आगारात ५ नवीन एसटी गाड्या दाखल
राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात आपल्या लाडक्या लालपरी एसटीच्या पाटण आगाराच्या ताफ्यात आज ५ नवीन गाड्या दाखल झाल्या. पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रयत्नांतून पाटण आगारात या ५ नवीन एसटी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या नवीन गाड्यांमुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध झाली, याचा आनंद असल्याची भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.
