मुंबई : ताडदेव कार्यालयातील महिला शौचालयात आग, मोठी दुर्घटना टळली
मुंबईतील ताडदेव कार्यालयातील मेझानाइन फ्लोअरवरील महिला शौचालयात आगीची घटना घडली. शौचालयाच्या भिंतीवर लावलेल्या पंख्याला आग लागल्याने त्याचे आवरण आणि केबल जळाले.
धुरामुळे सेन्सर सक्रिय झाला आणि सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. सुरक्षा प्रमुख श्री. महाले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.
सुदैवाने, कोणतीही दुखापत झाली नाही आणि परिस्थिती त्वरित नियंत्रणात आली. या घटनेच्या कारणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील.
