मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दहिवडीमध्ये भव्य रक्तदान शिबिर
दहिवडी: भारतीय जनता पार्टी माण तालुक्याच्या वतीने आज दहिवडी व म्हसवड शहरात राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.मा.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या मार्गदर्शनात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या भव्य रक्तदान शिबिरांचे उद्घाटन ना.जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. समाजातील गरजूंना नवजीवन देणाऱ्या या उपक्रमात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुख्यमंत्री साहेबांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी केलेली कृतिशील बांधिलकी आणि त्यांचा लोककल्याणाचा दृष्टिकोन याला समर्पित भावनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण करून या शिबिरात माण तालुक्यातील सर्व गावांमधून तसेच म्हसवड व दहिवडी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून या शिबिराच्या आयोजनासाठी आणि रक्तसंकलनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आणि पत्रकार बांधव, डॉक्टर,आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. दहिवडी नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक व भाजपा कार्यकर्ते यांनी शिबिर सुरळीतरित्या पार पाडण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी हजर राहून रक्तदात्यांची सेवा केली.
२०० पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान केले.
ना. जयकुमार गोरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत. २०० पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान केले.रक्तदानासाठी अनेक नागरिक इच्छुक होते. परंतु काही जणांचे वजन कमी होते. काही जणांना मधुमेह व रक्तदाब असल्यामुळे त्यांना रक्तदान करता आले नाही. अशी माहिती दहिवडीच्या नगराध्यक्ष सौ निलम अतुल जाधव यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर रक्तदान शिबिरे सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंतचा विक्रमी रक्तदान शिबिर झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून येथून पुढे राज्यात कधीही रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे पुण्याचे काम केल्याबद्दल सर्वच नागरिकांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया ना. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.
