महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत बिदालमध्ये महिला आरोग्य शिबिर 

दहिवडी:   मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत माण तालुक्यातील समृद्ध गाव बिदाल येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माण खटाव विधानसभा निवडणूक प्रमुख रंगनाथ भोसले  व ग्रामपंचायत बिदालच्या माध्यमातून महिला आरोग्य शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते. त्या भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी कार्यकारणी सदस्या सौ.सोनिया जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रमुख पदाधिकारी,मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी डॉ.संदीप पोळ, माण – खटाव विधानसभा भारतीय जनता पार्टी निवडणूक प्रमुख विक्रमसिंह (सोमनाथ) भोसले,संजय काका गांधी, नानासाहेब (नाना शेठ) दोलताडे, अस्थिरोग तज्ञ डॉ.बाबासाहेब दोलताडे, डॉ.राहुल दोलताडे, डॉ.अरुण पाटील, डॉ.अमित पाटील, डॉ.चिरमे, डॉ. माधुरी कवितके, डॉ. कर्णे, सरपंच प्रमोद जगदाळे , उपसरपंच विशाल मदने ,प्रताप आप्पा भोसले, शिवाजीराव जगदाळे ,सुरेश भाऊ जगदाळे,माजी सरपंच बापुराव जगदाळे,माजी सरपंच गौरीताई जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य, किरण जगदाळे, शंकर जगदाळे, सुरेश बोराटे, राम मदने, अमित कुचेकर, युवानेते बालाजी जगदाळे, प्रमोद ढोक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ, पदाधिकारी मान्यवर, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

         यावेळी सौ.सोनिया गोरे यांनी सदर शिबिरात महिला भगिनींना कोणकोणत्या वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत याची माहिती घेतली. तसेच शिबिराला आलेल्या महिला वर्गाची विचारपूस केली. त्याचबरोबर अन्य समस्या, सोई सुविधा यांचा आढावा घेतला. याप्रसंगी बोलताना सोनिया गोरे म्हणाल्या की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत उपक्रमांतर्गत महिलांना प्रशिक्षण, जनजागृती आणि पंचायतराज संस्थांच्या कामात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि संसाधने दिली जातात.हे अभियान केवळ महिलांना सक्षम करण्यावरच नव्हे, तर ग्रामीण प्रशासनाला अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक बनवण्यावरही लक्ष केंद्रित करते, जेणेकरून ‘सशक्त पंचायत, समृद्ध महाराष्ट्र’ हे ध्येय साध्य करता येईल.महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान देऊन आणि स्थानिक प्रशासनात त्यांची भूमिका बळकट करून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे. आरोग्याच्या दृष्टीने माणूस सुदृढ असेल तर कोणत्याच प्रकारच्या समस्या निर्माण होत नाही. त्यात करून घरची स्त्री ही जर सशक्त असेल निरोगी असेल तर घराची प्रगती होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने हाती घेतलेला हा उपक्रम मोठा टप्पा असून राज्याच्या विकासात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. याचा लाभ जास्तीत जास्त महिला व माता भगिनी यांनी घ्यावा असे आवाहन केले.या शिबिरात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. ८०० महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला 

    डॉक्टर संदीप पोळ, डॉक्टर बाबासाहेब दोलताडे यांच्यासह आदी मान्यवरांनी या आरोग्य शिबिर कार्यक्रमात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सर्वांनीच संविधानाचे वाचन करून दर तीन महिन्याला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा संकल्प केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!