महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आंधळी येथे विविध जनउपयोगी शिबिरांचे आयोजन

दहिवडी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मौजे आंधळी (ता. माण, जि. सातारा) येथे महसूल विभागामार्फत विविध जनउपयोगी शासकीय दाखले वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये ग्रामस्थांना रहिवासी, उत्पन्न, जात, राष्ट्रीयत्व आदी महत्त्वाचे दाखले उपलब्ध करून देण्यात आले.

या कार्यक्रमात मा. उपसरपंच सौं. सविता खरात यांच्या हस्ते विविध प्रकारचे शासकीय दाखले लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची नवीन प्रकरणे स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्यात आली.

याचबरोबर भारतीय पोस्ट विभागाच्या वतीने बाल आधार मेळावा तसेच मोबाईल आधार लिंक शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा लाभ घेत अनेक नागरिकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची आधारशी लिंक करून घेतली व बालकांचे आधार नोंदणी कार्य पूर्ण करण्यात आले.

 

     या प्रसंगी आदर्श सरपंच श्री. दादासाहेब काळे, सौं. सविता खरात, श्री. योगेश काळे, ॲड. किशोर खरात, दादा आप्पाजी काळे, मंडल अधिकारी श्री. विजय जाधव, ग्राम महसूल अधिकारी श्री. सुमित मिसाळ, महसूल सेवक श्री. नाथा चव्हाण, पोस्टमास्तर पांगरी श्री. हंबीराव गायकवाड, पोस्टमास्तर बिजवडी श्री. लक्ष्मण घाडगे पोस्टमास्तर तोंडले श्री. चैतन्य जाधव, पोस्टमास्तर आंधळी भाग्यश्री ढेंबरे, पोस्टमास्तर मलवडी श्री. ओंकार चव्हाण, पोस्टमन मलवडी श्री. अविनाश धुमाळ तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना शासकीय सेवांचा लाभ गावातच मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून प्रशासन व ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नातून गावाचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!