म्हसवड पोलिसाकडून 4 तासात आरोपी जेरबंद
म्हसवड(ता.माण)पोलीस ठाण्यामध्ये नागेश मोहन दिडवाघ राहणार दीडवाघवाडी(ता. माण) यांनी रविवारी दि.२०एप्रिल रोजी म्हसवड पोलीस ठाणे तक्रार दिली होती की, मी आणि माझे मित्र आणि सासरे यांच्यासोबत विरळी येथील शिवनेरी अवतार ढाब्याजवळ जेवायला गेलो होतो. जेवण करून रात्री पावणेदहाच्या सुमारास परत घरी जात असताना दोन मोटरसायकल वरून सहा ते सात अज्ञात दरोडेखोरांनी येऊन रस्त्यामध्ये अडवून लोखंडी रॉडने तसेच तलवार, कोयता,तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या चैनी व रोख रक्कम रुपये ५ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून घेऊन गेले बाबत तक्रार दिली होती.
सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचे सर्व माहिती घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफ सह तात्काळ आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली. या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचबरोबर तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून आणि इतर गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील सर्व ६आरोपींना अवघ्या ४ तासात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मोठया सीताफिने पकडून त्यांनी या दरोड्यांमध्ये लुटलेला संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच आरोपींनी गुन्हा करताना वापरलेले हत्यारे तलवार, कोयता, बंदूक ही सुद्धा आरोपींकडून ताब्यात घेतलेली आहे तसेच गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
अटक केलेल्या दरोडेखोर आरोपींची नावे
1) विजय बाबा शिंदे
2) समाधान सिदा गोरड
3) प्रवीण सुरेश गोरड
4) करण नवनाथ गोरड
5) विशाल महादेव नलवडे
6) अक्षय महादेव गोरड
सर्व राहणार विरळी(ता. माण )
सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर या अगोदर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.या आरोपीनी सातारा सांगली सोलापूर जिल्हात अशाप्रकारचे अनेक धाडसी जीवघेणे दरोडे टाकले असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.या आरोपीना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
सदरची कामगिरी ही माननीय अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,
पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, अमर नारनवर,सुभाष भोसलेभगवान सजगने नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे,श्रीकांत सुद्रिक अभिजीत भादुले, सतीश जाधव,महावीर कोकरे यांनी केली आहे.
सपोनि.अक्षय सोनवणे यांच्या कामगिरीचा पुन्हा जिल्ह्यात दरारा
सपोनि. अक्षय सोनवणे यांच्या हातून अनेक सराईत गुन्हेगार सुटले नाहीत. त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हा करण्याचे धाडस कोणी करत नाही. दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असताना १०० पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना त्यांनी अनेक राज्यातून अटक केली आहे.आणि आज धाडसी दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना अवघ्या चार तासात अटक केली आहे.त्यांच्या आदर्श कामगिरीमुळे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
