महत्त्वाच्या बातम्या

या घटनेने पुणे हादरलं….  फिरायला गेलेले 5 मित्र पसार पानशेत परिसरात भीतीचे वातावरण…. नेमकं काय घडलं? 

      पुणे शहराला हादरून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादावादीतुन एकाच खून करण्यात आला आहे. पुणे शहरातील पाच जण मित्र पानशेत परिसरात फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे आता पाचही जणांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. पानशेत येथे फिरण्यासाठी गेलेल्या 5 मित्रांनी किरकोळ कारणावरून  एका युवकाचा खून केला आहे. खून केल्यानंतर हे पाचही जण पसार झाले होते. परंतु सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रोहिदास काळूराम काटकर (वय 24) रा. कादवे, ता. वेल्हा, पुणे असे आहे. 
     मिळालेल्या माहितीनुसार,  15 जून रोजी हे पाचही मित्र पानशेत परिसरात फिरायला गेले असता त्यांनी नंदाबाई कुंभार मावशीच्या हॉटेलसमोर सिगारेट ओढायला सुरुवात केली. त्यावेळी तेथील  स्थानिक रहिवासी रोहिदास काटकर यांनी सिगारेट ओढण्यास त्यांना विरोध केला. त्यावरून बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात पाचही आरोपींनी त्याला  मारहाण केली. एकाने त्याच्या छातीवर दगड मारल्याने रोहिदासचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पानशेत परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पर्यटनस्थळी सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपासाला सुरुवात केली. 
          रमेश उर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय 21), भागवत मुंजाजी आसुरी (वय 20),आकाश सुभाष भिसे (वय 21), रितेश उत्तम जोगदंड (वय 19), पांडुरंग भानुदास सोनवणे (वय 19) अशी आरोपींची नावे आहेत. हे पाच जण मूळचे परभणीचे असून सध्या पुण्यातील नऱ्हे भागात राहतात. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय गुन्हे शाखा आणि वेल्हा पोलीस ठाण्याच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करून सर्व आरोपींना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!