दहिवडी नगरपंचायत हद्दीतील रस्त्यावरील जीवघेणे खड्डे मुजविजण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष युसूफभाई शेख यांनी जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार माण व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनाचे निवेदन दिले होते.
माण प्रशासनाने या निवेदनाचा विचार करून दहिवडी हद्दीतील मायणी रोड, फलटण रोड, म्हसवड रोड, सातारा रोड वरील सर्व खड्डे मुजविण्यात आले आहेत.त्यामुळे नागरिकांचा प्रवास सोईस्कर झाला आहे. याबद्दल युसूफभाई शेख यांचे संपूर्ण तालुक्यातून आभार मानले जात आहेत.