रयत इंग्लिश मिडियम स्कूल, भुईंज येथे चिमुकल्यांचा बाल बाजार संपन्न
भुईंज येथील रयत इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये चिमुकल्यांचा शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला Kids Market Day(बाल बाजार) मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा.श्री भैय्यासाहेब जाधवराव तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. एम. एस. साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्मवीर आण्णा व माई यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांनी Kids Market चे उद्घाटन केले. यावेळी सर्व विध्यार्थ्यांनी मोठ्या उस्फुर्तपणे या बाजारात भाग घेतला होता.
या कार्यक्रमासाठी सर्व विध्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमोल सावंत, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार लाभले. या उपक्रमांतर्गत सर्व पालकांनी या कार्यक्रमास उस्फूर्त उपस्थिती दर्शवली आणि विद्यार्थ्यांच्या कला-कौशल्याचे तोंड भरून कौतुक केले.विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळून त्यांचे व व्यवसायिक कौशल्ये विकसित करणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदात संपन्न झाला.
