महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे विभागीय खो खो स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

      राजेंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खंडाळा येथे मंगळवार दि ५ नोव्हेंबर रोजी  सकाळी ११.०० वाजता क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य , जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा व राजेंद्र विद्यालय खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर विभागीय शालेय खो खो स्पर्धा २०२४-२५ चे उद्घाटन श्री. युवराज नाईक, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या हस्ते व श्री. माणिक पाटील, उपसंचालक , कोल्हापूर विभागीय कार्यालय कोल्हापूर, श्री. अजित पाटील, तहसिलदार ,खंडाळा , श्री. नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा , श्री. अनिरुद्ध दादा गाढवे, सचिव, खंडाळा विभाग शिक्षण समिती, खंडाळा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
      उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांनी उपस्थित सर्व स्पर्धक खेळाडू यांना मागदर्शन केले, तसेच कुमार मयुर जाधव या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन व कौतुक केले. श्री. महेंद्र गाढवे , सचिव जिल्हा क्रीडा असोसिएशन यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल गौरव करण्यात आला.
या स्पर्धा दि.०५/११/२०२४ ते ०७/११/२०२४ या कालावधीत होणार आहेत. तरी सर्व क्रीडा प्रेमींनी या संधीचा फायदा घ्यावा , असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य. श्री.शब्बीर नालबंद यांनी केले आहे.
   उद्घाटन प्रसंगी खंडाळा नगरीतील सर्व क्रीडा प्रेमी, ग्रामस्थ,विद्यार्थी, श्री. प्रल्हाद खंडागळे, माजी नगराध्यक्ष , श्री. शैलेश गाढवे नगरसेवक, श्री. दत्ता गाढवे, माजी उपनगराध्यक्ष, श्री. अशोक गाढवे, संचालक, खंडाळा सहकारी साखर कारखाना, श्री. दत्तात्रय पवार, अध्यक्ष, नागेश्वर पतसंस्था , आदी मान्यवर उपस्थित होते.
    श्री. डी. जी. गाढवे, श्री. व्हि. एन. गाढवे, श्री. महेंद्र गाढवे, श्री. व्हि. एस. राऊत, श्री.विवेक तळेकर,श्री. दिग्विजय खंडागळे, श्री. विनोद खंडागळे यांनी सदर स्पर्धेचे उद्घाटनाचे उत्तम नियोजन केले होते.‌उपस्थित मान्यवरांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!