महत्त्वाच्या बातम्या

राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेत राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालयाचे उज्वल यश

   क्रीडा व युवक  सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर बोरीवली यांचे संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.दि 28 नोव्हेंबर व 29 नोव्हेंबर रोजी या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत   खंडाळा विभाग शिक्षण समितीचे राजेंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खंडाळा व भाग शाळा बावडा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्वल यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुली कु.समीक्षा अभिजीत पवार द्वितीय क्रमांक चॅम्पियनशिप, 14 वर्षाखालील मुले सार्थक नितीन पवार तृतीय क्रमांक चॅम्पियनशिप, 17 वर्षाखालील मुले अथर्व भगवान भिसे प्रथम क्रमांक चॅम्पियनशिप,19 वर्षाखालील मुले शीतलकुमार महेश पवार तृतीय क्रमांक चॅम्पियनशिप यांनी शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप प्रमाणपत्र, सहभाग प्रमाणपत्र,मेडल मिळवून चांगली कामगिरी केली. या विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना विद्यालयाचे प्राचार्य शब्बीर नालबंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांनी राजेंद्र विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक केले.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे बावडा गावचे मलखांब प्रशिक्षक ग. म. पवार गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचालीसाठी योग्य ते मार्गदर्शन केले.तसेच या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक व्ही. एन. गाढवे,बी.ई. धर्माधिकारी, राऊत व प्रशिक्षक महेंद्र पवार, पवार गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले. या उज्वल यशासाठी खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा संस्थेचे अध्यक्ष शंकररावजी गाढवे सर, सचिव अनिरुद्ध गाढवे, व सर्व संचालक मंडळ,सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय प्राचार्य डॉ हणमंत जाधव,उपप्राचार्या अरुंधती गाढवे , उपमुख्याध्यापिका सुशीला मोहिते, पर्यवेक्षक धनंजय महामुनी व व्हि.जे.चौधरी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!