राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा संपन्न
विधानसभा निवडणूकीत बहुमताने विजयी होऊन महायुतीचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन.
मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसदविवेक बुद्धीने पार पाडेन. संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे आणि निष्पक्षपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.”
“मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करुन एरवी कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.
