महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील ८ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असतानाच हवामान विभागाने वादळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरूवारी राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला तर काही ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला. विदर्भात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

       रखरखत्या उन्हात राज्यामध्ये पावसासाठी पोषक हवामान तयार झालेय. पश्‍चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडू शकतो. शिवाय काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भात पुढील तीन दिवस अवकाली पावसाचा इशारा देणयात आला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे.
         मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसाच्या या अचानक आगमनामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच विजेच्या गडगडाटामुळे विद्युत पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकरी, वाहनचालक आणि नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हा सिस्टम पुढील २४ तासांत अधिक कमकुवत होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्रात काही भागांवर जाणवण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!