महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मोर्चा बांधनीला सुरवात

पुणे शहरात शरद पवार गटाने मोर्चे बांधणी सुरु केलीआहे. सुप्रिया सुळे देखील कामाला लागल्या आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. विधानसभेचे उपसभापती यांनी मंत्रालयाच्या जाळीवरती उडी मारली त्यावरती सुळे म्हणाल्या, सत्तेमधला आमदार नाही तर उपसभापती मंत्रालययात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो हे किती दुर्दैव आहे. या सरकारला कोणाचे ही काही देणे घेणे नाही. या ट्रिपल इंजिन सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे. हे काही झाले कि शरद पवार यांचे नाव घेतले जाते. लोकशाही मध्ये सगळे बोलतात,सगळच जर शरद पवार करणार असतील तर देऊन टाका त्यांच्या हातात सत्ता असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱयावर आहे, अतिथी देवो भव,त्याच स्वागत केल पाहिजे, पंतप्रधान यांनी यावे पण माझ्या अपेक्षा आहेत की महिलांवरील अत्याचार घटना वाढल्या आहेत,उपसभापती असणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार आहे महाराष्ट्राला शोभणार नाही,त्यांनी याकडे लक्ष घालावं. राज्यातील महिलांना सुरक्षा देणं सरकारांचे काम आहे, सध्या वर्दीची भीती राहिली गुन्हेगारांना राहिली नाही , कधी ब्लड सॅम्पल बदलता येतात काहीही करता येत. १५०० रुपये सरकार वाटत आहे,त्या आता महिला नको म्हणत आहेत, त्यांना सुरक्षा हवी आहे. मी पोलिसांवर कधीच आरोप करणार नाही,आपलीं यंत्रणा सगळ्यात चागली आहे,पोलिस यंत्रणा आर आर पाटील अनिल देशमुख यांच्या काळात हेच पोलिस होते,मग देवेंद्र असताना गुन्हे का वाढत आहेत,आता नागपूरहून पुणे गुन्हेगारीचे कॅपिटल होत आहे.

 

दौंडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे. माजी आमदार रमेश थोरात हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे. रमेश थोरातांनी पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन सविस्तरपणे चर्चा केल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दौंडच्या उमेदवारीसाठी थोरात इच्छूक असल्याची माहिती समोर आली आहे. याचपार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे म्हणल्या की, आमची सगळ्यांची बरीच काम असतात आणि आमच्या सगळ्यांचे खुप आधीपासून एकमेकांसोबत ऋणानुबंध आहेत. आमच्या संपुर्ण कुंटुंबाचे थोरातांसोबत चांगले संबंध आहेत. प्रत्येक सभा माझ्या मतदार संघातली राजकीय असते हा आग्रह कशाला सहकारातली काम असतात, दिल्लीतली काम असतात.

 

पाटील कुटुंब आणि पवार कुटुंब यांचे सहा दशकांचे संबंध आहेत. हर्षवर्धन पाटील पुन्हा आमच्याकडे येत आहेत, याचा आनंद आहे. मधल्या काळात विचार वेगळे झाले होते मात्र आमचे संबंध कायम होते. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील काहीजण नाराज झाले असतील तर ते साहजिक आहे. कारण प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळावी, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हंटले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देताना इंदापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. मात्र, त्यांना उमेदवारी दिल्यामुळं जे नाराज आहेत, त्यांची समजूत काढणं हे आमचं काम आहे ते आम्ही करु, अशी भूमिका सुळे यांनी मांडली आहे.

 

शरद पवार यांच्या उपस्तितीत मराठवाड्यात इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली आहे. यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या उपस्थितीत पुण्यात शरद पवार स्वत: मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेताना दिसत आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराशी शरद पवार स्वत: चर्चा करत आहेत. शरद पवार यांच्या कार्यपद्धत पाहिली तर त्याच्यासाठी कुणी लहान किंवा मोठा नाही. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. त्या प्रत्येकाशी शरद पवार स्वत: भेटणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सर्वांचे ऐकूण घेतल्यानंतरच ते कुणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय घेतील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

बजरंग सोनावणे यांच्या मतदारसंघातील उमेदवारीसाठी मुलाखती घेतल्या. ज्या ज्या ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षांचे आमदार- खासदार आहेत, त्यांची मते विचारात घेऊनच निर्णय घेतले जाणार आहेत. पण ज्यांनी ज्यांनी इच्छुक म्हणून अर्ज केलाय त्यांचाही मानसन्मान होणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!