महत्त्वाच्या बातम्या

लोकप्रांत च्या पाठपुरव्याने ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी

    महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष जिल्हा अध्यक्ष किरण दादा बगाडे व युवक जिल्हा अध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांच्या  नेतृत्वात गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांना  निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी लोकप्रांत न्यूज चैनल च्या माध्यमातून बातमी केली असता तातडीने त्या निवेदनाची गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांनी दखल घेऊन स्मशानभूमीतील जाळी बसवण्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे सर्व मातंग समाज खूप आनंदी झाला आहे.  छोट्या छोट्या गोष्टी साठी संघर्ष करायला लागतो आणि त्या संघर्षाला वाचा फोडण्याचं काम महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष तसेच लोकप्रांत न्यू्स चैनल च्या माध्यमातून होत आहे. आज सर्वांचेच मातंग समाज हरपळवाडी आभार व्यक्त करत आहे. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष जिल्हा अध्यक्ष किरण दादा बगाडे तसेच युवक जिल्हा अध्यक्ष सोमनाथ धोत्रे कराड उत्तर तालुका अध्यक्ष मंगेश गायकवाड यांनी लोकप्रांत न्यूज चे आभार मानले तसेच लोकप्रांत चे सातारा प्रतिनिधी समीर निकम यांनी सदर घटनेचा पाठपुरावा केला.  गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांनी हरपाळवाडी येथील स्मशानभूमीच्या अडचणीच्या निवेदनाची दखल घेऊन   तातडीने प्रश्न मार्गी लावला. लोकप्रांत न्यूज चॅनेल चे तसेच हा प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्याबद्दल ग्रामस्थांनी आणि आर पी आय   पक्षाने आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!