महत्त्वाच्या बातम्या

लोहगावमध्ये प्रथमच आढळला दुर्मिळ पट्टेरी कवड्या साप

लोहगाव: लोहगाव- चर्होली येथील डी वाय पाटील कॉलेज परिसरात रात्रीच्यावेळी एक साप फिरताना दिसला असता तेथील काही स्थानिक लोकांनी जवळच्या सर्पमित्रांना फोन केला.त्यानंतर  कलवड परिसरातीलच एक सर्पमित्र आकाश माने  हे तेथे जाऊन पोहोचले आणि शोध घेतल्यानंतर साप एका दगडाखाली लपलेला आढळला. शांतपणे निरीक्षण केल्यावर लक्षात आले की हा साप आपल्या भागात दुर्मीळ आहे.

बार्ड वुल्फ स्नेक विषारी की बिनविषारी ?

       हा साप म्हणजे बार्ड वुल्फ स्नेक (Lycodon striatus) — पूर्णपणे बिनविषारी, अतिशय लाजाळू आणि मुख्यतः रात्री सक्रिय असणारी एक दुर्मीळ प्रजाती. आपल्या परिसरात याचा आढळ फारच क्वचित होतो. काळसर शरीरावर असलेल्या नितळ, पांढऱ्या आडव्या पट्ट्यांमुळे त्याची ओळख पटकन होते आणि त्याचे देखणे रूप विशेष लक्ष वेधून घेते. अशी माहिती सर्पमित्र आकाश माने यांनी दिली तसेच वनरक्षक श्री.अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा साप पुन्हा त्याला अनुकूल अशा निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आला. असे सर्व काही वन्यजीव प्राणी, साप हे आपल्या आसपासच्या परिसरात आढळतात. वाढत्या शहरीकरणामुळे त्यांचे प्रमाण कमी होत आहे याबाबत आपण काळजी घेतली पाहिजे अशी सर्व माहिती वनसंरक्षक अनिल राठोड यांनी स्थानिक नागरिकांना दिली.या सापाला पकडल्यानंतर नागरिकांना योग्य माहिती देत त्यांच्या मनातील भीती दूर केली आणि समजावले की हा साप बिनविषारी असून मानवाला कोणताही धोका पोहोचवत नाही. अशा दुर्मीळ प्रजाती आपल्याला निसर्गाची समृद्धी आणि त्याच्या संवर्धनाची जाणीव करून देतात. जर असा साप दिसला, तर घाबरू नका — प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधा, ज्यामुळे सापाची आणि आपली सुरक्षितता सुनिश्चित होते असे देखील अनिल राठोड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!