वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर –
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाची प्रेस कॉन्फेरेंस आज पार पडली. या कॉन्फरन्स मध्ये आगामी विधानसभेच्या निवडणूकीसाठी आपल्या उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. खतीब सय्यद हे प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलत होते जे एक मुस्लिम नेते आहेत.
खतीब यांनी काँग्रेस पक्षास राजीनामा देऊन वंचित बहुजन आघाडी (VBA) मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांचे म्हणणे आहे की, काँग्रेसने सध्याच्या निवणुकीत मुस्लिमांना जागांचे वाटप योग्य
रितीने केले नाही. तसेच लोकसभा निवडणुक आणि महाराष्ट्र एमएलसी निवडणुकीत देखील योग्य भागीदारी दिली नाही. काँग्रेसने हिंदुत्वाची विचारधारा अवलंबली आहे.व मुस्लिमांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले आहे. असा त्यांनी आरोप केला आहे.
खतीब यांचे म्हणणे आहे की, मुस्लिमांची राजनैतिक ताकद आणि अस्तित्व टिकवुन ठेवण्यासाठी VBA हा एकमेव पर्याय आहे.वंचित बहुजन आघाडी ही मुस्लिमांच्या अधिकारांसाठी खंबीरपणे उभी आहे असे खतीब म्हणाले.त्यांनी मुस्लिम बांधवांना अन्य सेक्युलर पार्टींना समर्थन देण्यासाठी विचार करण्यास सांगितले आहे.वंचित बहुजन आघाडीने विधानसभेच्या निवडणूकीसाठी आपल्या 11 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.
