महत्त्वाच्या बातम्या

वरकुटेमध्ये होणार मोफत सामुदायिक विवाह सोहळा; तानाजी नरळे यांची संकल्पना

दहिवडी: अस्मानी पावसाने संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना तसेच पूरग्रस्त बाधित झालेल्यांना एक आधार म्हणून सालाबादप्रमाणे यंदाही वर्ष १० वे श्रीमती फुलाबाई बापू नरळे सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट आणि साईसागर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर यशवंतराव चव्हाण हायस्कूलवर वरकुटे तालुका माण जिल्हा सातारा येथे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 

   ज्यांची नजिकच्या काळात लग्ने ठरली असतील किंवा ठरायची असतील त्यांनी वरील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी लवकरात लवकर नावे नोंदवावी आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

 या सामुदायिक विवाह सोहळ्याची खास वैशिष्ट्ये

 

१) वधूवरांना संपूर्ण पोषाख व ५१ भांड्याचा सेट आयोजकांकडून सप्रेम भेट दिले जाणार आहे.

२) भव्यदिव्य सुंदर असा सजावट केलेला लग्नमंडप

३) हजारों लोकांच्या उपस्थितीत वधूवरांना शुभ आर्शिवाद 

४) उपस्थितांना स्वादिष्ट भोजन

 

 या संधीचा फायदा घेण्यासाठी आपणांस लवकरात लवकर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

विशेष महत्त्वाचे :- या सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्ने होणे म्हणजे सन्मान व प्रतिष्ठेचे समजणे. कितीही करोडपती असला किंवा एखाद्या गरीब असला तरी मानसन्मान सारखाच होणार आहे.लवकरात लवकर आपली नांवे नोंदवा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा ही विनंती आहे. श्री. तानाजीराव बापू नरळे संस्थापक अध्यक्ष श्रीमती फुलाबाई बापू नरळे सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट पिंपरी चिंचवड पुणे, यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!