वरकुटे-मलवडीत रंगणार कुस्त्यांचा महासंग्राम
माढा लोकसभा मतदारसंघाचे धडाडीचे नेते आणि माण खटाव तालुक्याचे युवा नेतृत्व अभयसिंह (दादा) जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रोलर असोसिएशनने अॅथलेटिक्स महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा यांच्या मान्यतेने, भव्य आणि दिव्य माण-खटाव केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती अभपदादा कुस्ती प्रेमी संघटना माण खटाव च शिव संकल्प प्रतिष्ठान वस्कुटे मलवडी यांनी दिली. दि. १६ मे रोजी गट वाईन व खुल्या कुस्ती स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना वर्षभर आकर्षक मानधन देण्यात येणार आहे. तर दि.१७ मे रोजी भव्य राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके, पै. शुभम सिदनाचे विरुद्ध पै. गणेश कुंकुले, पै. प्रशांत दुबे विरुद्ध पै. प्रशांत शिंदे, पै. विक्रम भोसले विरुद्ध पै. प्रशांत जगताप यांच्यात लढती होणार आहेत. तर महिला कुस्ती स्पर्धेत पै. वेदांतिका पवार विरुद्ध पै. पूजा लोंढे , पै. धनश्री फंड विरुद्ध पै. ऋतुजा पाटील, महाराष्ट्र चॅम्पियन पै. ऋतुजा जाधव विरुद्ध पै. विशाली यादव, युनिव्हर्सिटी चॅम्पियन पै. ऋतुजा सपकाळ विरुद्ध पै. महाराष्ट्र केसरी प्रठोका कांबळे यांचा सामना होणार आहे. या व्यतिरिक्त माण खटाव केसरी खुल्या गटासाठी हो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त इतर कुस्त्या मैदानादिवशी सकाळी ९ ते १२ या वेळेत जोडल्या जातील.
यंदा अभयदादा जगताप प्रेरणा पुरस्काराने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड, सामाजिक कार्यकर्ते व अभिनेते समृद्धी जाधव बाबा, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर, आदर्श वस्ताद सचिन नाळे, ऑल इंडिया चॅम्पियन नाथा गेंड यांना प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी माणचे सुपूत्र उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत यांचा मानदेश रत्न पुरस्कार २०२५ ने सन्मान करण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी हिंदकेसरी दीनानाथ सिंह, महाराष्ट्र केसरी शिवाजी पाचपुते,महाराष्ट्र केसरी बापू दादा लोखंडे, पैलवान धनंजय पाटील सरचिटणीस जिल्हा कुस्ती संघ सातारा, हिंदकेसरी संतोष वेताळ, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे , महाराष्ट्र केसरी पैलवान गोरख सरक, माण कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष दादासाहेब काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महाराष्ट्रातील नामांकित मल्लांची पंच म्हणून उपस्थिती असणार आहे. सदरच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन अभयदादा कुस्तीप्रेमी संघटना माण खटाव व शिवसंकल्प प्रतिष्ठान वरकुटे मलवडी यांनी केले आहे. स्पर्धाप्रमुख म्हणून आशियाई सुवर्णपदक विजेते प्राध्यापक पैलवान अमोल साठे काम पाहणार आहेत. लाल मातीवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील कुस्ती मल्लांनी या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन सदर स्पर्धेचे आयोजक ऋषिकेश भैय्या जगताप यांनी केले आहे.
