वाई तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. पुण्यनगरीचे बावधन प्रतिनिधी सचिन जयसिंग ननावरे यांची बिनविरोध निवड
वाई तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. पुण्यनगरीचे बावधन प्रतिनिधी सचिन जयसिंग ननावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी सकाळचे वाईचे प्रतिनिधी भद्रेश पदमसी भाटे, उपाध्यक्ष पदी कृष्णात घाडगे,(दै. महासत्ता) कुमार पवार (दै.प्रभात) सचिवपदी विठ्ठल माने(दै. सकाळ)यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वाई तालुका मराठी पत्रकार संघाची विशेष सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे, विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ पत्रकार शिवाजीराव जगताप, मधु नेने यांच्या उपस्थितीत वाई येथील शासकीय विश्रामगृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. कार्यकारिणीमध्ये सहसचिवपदी अशोक इथापे, (साप्ताहिक संकल्प न्यूज)खजिनदारपदी जितेंद्र वारागडे (दै पुण्यनगरी) सदस्यपदी पांडुरंग भिलारे (दै.लोकमत) किशोर रोकडे ( दै ऐक्य) राजगुरू कोचळे (सातारा न्यूज) ओमकार पोतदार (दै पुढारी) पांडुरंग खरे ( दै तरुण भारत) चरण गायकवाड,शुभम कोदे दै पुढारी) आदिंचा समावेश आहे.
सभेच्या सुरुवातीस मावळते अध्यक्ष विश्वास पवार यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या कामांचा आढावा सादर केला.यानंतर अध्यक्षपदासाठी जयवंत पिसाळ यांनी सचिन ननावरे यांचे नाव सुचविले व कृष्णात घाडगे यांनी अनुमोदन दिले नंतर ननावरे यांची अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली.वरीलप्रमाणे इतर कार्यकारिणीचीही बिनविरोध निवड करणेत आली.
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन ननावरे म्हणाले,जेष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकारी पत्रकारांच्या साथीने वाई तालुक्यातील पत्रकार संघटना बळकट करण्यावर आपण भर देणार आहोत.पत्रकारांचे मी प्रश्न,समस्या सोडविण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम व शासकीय योजना तालुक्यात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. विधायक कार्यातून पत्रकार संघाला उर्जितावस्था प्राप्त करून देणारे आहोत.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर,ज्येष्ठ पत्रकार श्री शिवाजीराव जगताप,श्री मधूसुदन नेने,श्री विश्वास पवार,श्री राहुल तांबोळी,श्री जयवंत पिसाळ,श्री विलास साळुंखे,श्री अशोक येवले,श्री सचिन इथापे,श्री हेमंत बाबर,श्री बापू वाघ,पै तानाजी कचरे,श्री संजय माटे,श्री पांडूरंग खरे,श्री अनिकेत शिंदे,श्री प्रविण गाडे आदि पत्रकार उपस्थित होते.
