महत्त्वाच्या बातम्या

विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या प्रवेशातील अर्जांच्या त्रुटी पुर्तता करण्याचे आवाहन

सातारा: सामाजिक न्याय विभागाच्या  वसतिगृहामध्ये इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी, इयत्ता ११ वी १२ वी व १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी/ पदवीका विद्याथ्यांचे ऑनलाईन पोर्टलद्वारे (https://hmas.mahait.org)tया संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरणेत आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी अढळून आल्या आहेत अशा विद्यार्थ्यांच्या अर्ज त्रुटींची  पुर्तता करण्याकरीता पुनः विद्यार्थ्यांच्या लॉगईनला पाठविण्यात आले आहेत.

         सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा संपूर्ण प्रदीर्घ कालावधी होऊनही अनेक विद्यार्थ्यांनी Revert Back केलेले अर्ज त्रूटी पुर्तता करुन फेर सादर केलेले नाहीत. अर्जातील त्रुटींची पुर्तता करण्यासाठी विद्यार्थ्यांना दिनांक १० जून २०२५ ही तारीख देण्यात आलेली आहे तरी त्रुटींची पुर्तता करून अर्ज फेर सादर करण्यात यावेत, असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी सांगितले आहे. अधिक माहितीसाठी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा  येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!