महत्त्वाच्या बातम्या

व्याजाच्या पैशातून गहाण खत ऐवजी फसवून केला दस्त

दहिवडी: मार्डी(ता. माण )येथील सामाजिक कार्यकर्ता रोहित पोळ याने व अन्य सहा समाजकंटकांनी मिळून सावकारीच्या कर्जापायी जमीन हडप करण्यासाठी जमिनीचा वाद न्यायप्रविष्ठ असलेले बाब लपवून बनावट कागदपत्राच्या साहाय्याने हात चलाखी करून गहाण खत करण्याऐवजी खरेदीखत करून घेतले असल्याची तक्रार अनिल औदुंबर गायकवाड रा. मार्डी ता. माण यांनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे केली आहे.

    अनिल औदुंबर गायकवाड यांना शेतामध्ये विहीर बांधण्यासाठी पैशाची गरज होती. त्यांनी गावातीलच पूर्वीपासून सावकाऱीचा व्यवसाय करणारे नारायण नामदेव नारायणने यांच्याकडे गेले असता त्यांनी सांगितले रोहित दादा पोळ हे मध्यस्थी असतील तर मी तुला जमीन गहाण ठेवून दोन लाख रुपये कर्ज देऊ शकतो. म्हणून दि.२९ नोव्हेंबर २०२० रोजी रोहित पोळ याला मध्यस्थी म्हणून सावकाराकडे जमीन गहाण ठेवण्याच्या अटीवर घेऊन गेले. त्यानंतर सावकारांनी त्यांना दोन लाख रुपये दरमहा दोन टक्के व्याजदराने दिले.दि. ४ डिसेंबर २०२० रोजी गहाण खत करण्यासाठी आईचे संमती पत्र घेऊन आणायला सांगितले. कर्जदार व त्याचे आई दोघेजण ४ डिसेंबर रोजी सकाळी निबंध कार्यालय दहिवडी येथे गहाणखत करण्यासाठी गेले. रोहित पोळ याने त्याच्या ओळखीच्या बॉण्ड रायटर कडून गहाण खताचे कागदपत्रे टायपिंग केले त्याचबरोबर हात चलाखी करून खरेदी खताचे टायपिंग करून घेतले. कर्जदाराने व त्याच्या आईने गहाणखत समजून खरेदी खतावर सह्या केल्या.

      ४ महिन्यानंतर कर्जदार अनिल औदुंबर गायकवाड हे सावकाराकडे मुदलीसह व्याजाचे पैसे परत देण्यासाठी गेले असता. सावकार नारायण नामदेव नारायने व त्यांच्या पत्नीने सांगितले की तुम्ही घेतलेले व्याजाचे पैसे आम्हाला रोहित पोळ याने व्याजासह परत केले आहेत. तुमचा आणि आमचा व्यवहार संपलेला आहे रोहित पोळ आणि तुम्ही बघून घ्या असे सांगितल्यानंतर कर्जदार रोहित पोळ यांच्या घरी गेला व त्याला विचारले असता त्याने सांगितले की तुमचे सगळे पैसे मी सावकाराला दिले आहेत आणि तुम्ही मला गहाण खत न करता खरेदीखत करून दिले आहे. ह्या सर्व गोष्टी पुन्हा सावकाराला सांगितलं नंतर सावकार व त्यांची पत्नी म्हणाले की आम्ही तुम्हाला जमीन परत मिळवून देण्यास मदत करू घाबरू नका. असे सावकाराच्या पत्नीचे सर्व आवाज रेकॉर्डिंग तक्रारदार यांच्याकडे आहेत योग्य वेळी पुरावे म्हणून सादर करणार असे आयुक्तांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

 

जमीन वाटपाचा दावा सुरू असताना केला दस्त

        सदर दस्त केलेली जमीन आनेवारीतील असून वाटपाचा दावा सुरू असताना दुय्यम निबंधक यांना हाताशी धरून गहाण खत करतोय असे सांगून दस्त करून फसवणूक केली असल्याचे दाखल तक्रारीमध्ये म्हटले आहे.

 

 सोसायटीचा बोजा असताना दिला निलचा दाखला…

       सदाशिवराव पोळ विकास सेवा सोसायटीचे अनिल औदुंबर गायकवाड व त्यांच्या आईच्या नावे पीक कर्ज असताना सोसायटीचे सचिव अभय पोळ यांनी बनावट दस्त करण्यासाठी खोटा कर्ज नसलेला दाखला देऊन या कटामध्ये सामील आहे. असे देखील तक्राऱीमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!