महत्त्वाच्या बातम्या

व्यापाऱ्याच्या अपहरणाची घटना: २ कोटींच्या खंडणीची मागणी

पुण्यातील उच्चभ्रू परिसरात काल संध्याकाळी एका व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची गंभीर घटना घडली. व्यापारी अचानक गायब झाल्यानंतर, काही वेळातच अज्ञात अपहरणकर्त्यांनी त्याच्या पत्नीला फोन करून २ कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यांनी पैसे तयार ठेवण्याची धमकी दिली आणि पुढील सूचना मिळेपर्यंत मोबाईल बंद ठेवण्यास सांगितले.

     व्यापारी अचानक बेपत्ता झाल्याने त्याची पत्नी अत्यंत चिंतेत पडली. दोन तास उलटूनही अपहरण कर्त्यांकडून कोणताही पुढील संपर्क आला नाही, त्यामुळे तिने त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि घटनेची माहिती घेतली.

     अपहरणकर्त्यांनी पहिल्या फोन नंतर पुन्हा कोणताही संदेश किंवा कॉल केला नाही. त्यामुळे पोलिस तपासात काहीसाअडथळा निर्माण झाला. तरीही, पोलिसांनी वेगाने तपास सुरू ठेवत महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तपास सुरू असून, पोलिस लवकरच व्यापाऱ्याचा शोध घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

    ही घटना संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनली असून, पोलिस प्रशासन अपहरण कर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!