महत्त्वाच्या बातम्या

“शनिवारी दुपारी ३:३० वाजेपर्यंत वेळ…”; शिक्षकमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी CJP चा सरकारला अंतिम इशारा

नवी दिल्ली: नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि केंद्र सरकार यांच्यात पार पडलेली बैठकांची दुसरी फेरी अनिर्णित राहिली असून, सीजेपीच्या शिष्टमंडळाने सरकारला स्पष्ट शब्दांत अंतिम अल्टिमेटम दिला आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सीजेपीचे प्रतिनिधी आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या आक्रमकपणे मांडल्या. सरकारने शनिवार, २५ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजता पुन्हा चर्चेसाठी बोलावले असले, तरी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय अन्य कोणत्याही तडजोडीला हमारा विरोध असेल, असेCJP ने स्पष्ट केले आहे.

बैठक संपल्यानंतर जंतर-मंतरवरील मंचावरून आंदोलकांना संबोधित करताना आशुतोष रांका यांनी सांगितले की, सरकारने काही मुद्द्यांवर सकारात्मकता दाखवली असली तरी शिक्षमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जर येत्या एक-दोन दिवसांत धर्मेंद्र प्रधान यांना बडतर्फ केले नाही, तर २० जुलै रोजी झालेल्या देशव्यापी आंदोलनापेक्षाही तीव्र आणि मोठे आंदोलन उभारले जाईल, असा थेट इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. आम्ही सरकारला स्पष्ट सांगितले आहे की आता केवळ आश्वासनांवर बोळवण केली जाणार नाही, पंतप्रधानांनी यावर निर्णय घेऊन मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. पुढच्या वेळी जेव्हा आम्ही भेटू तेव्हा राजीनामा हातात घेऊनच परत येऊ, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दरम्यान, या बैठकीत विद्यार्थ्यांच्या इतर दोन-तीन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे बोलले जात असले तरी, मुख्य मागणीवर अजूनही तिढा कायम आहे. शनिवार दुपारपर्यंत चालणाऱ्या या बैठकीत आणि त्यानंतर होणाऱ्या निर्णयातून नेमके काय समोर येते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सीजेपीच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात दिल्लीतील राजकीय वातावरण आणि आंदोलनाची दिशा कशी असणार, हे शनिवारच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!