शासन निर्णयाच्या विरोधात शिक्षकांचे राज्यव्यापी आंदोलन
सातारा : राज्यातील शाळेतील शिक्षक संख्येवर प्रतिकूल परिणाम करणारा आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या गावात शिक्षण मिळवण्याच्या हक्कापासून वंचित ठेवणारा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय अद्याप रद्द करण्यात आलेला नाही. या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने 17 मार्च 2025 रोजी राज्यव्यापी आंदोलन केले.
सातारा जिल्ह्यातील हे आंदोलन प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे आणि सरचिटणीस संतोष मांढरे यांच्या अध्यक्षेखाली पार पडले. तसेच, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक आणि प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यकारणी सदस्य विशाल कणसे हेही या आंदोलनाला उपस्थित होते.
या आंदोलनात जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलनानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त आणि प्रधान सचिव यांना शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
