शाहूनगरमध्ये चेन स्नॅचिंग वाढले; नागरिक भयभीत
शाहूनगर येथे सतत होणाऱ्या महिलांच्या दागिने चोरांचा व चेन स्नॅचिंग चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शाहूनगरवासीयांनी केली आहे.सातार शहराला लागून असलेल्या कुशीत वसलेल्या शाहूनगर या उपनगरामध्ये गेल्या एक महिन्याच्या काळामध्ये चार वेळा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार झालेले,असून नागरिक भयभीत झाले.
चोरांचा बंदोबस्त करावा अश्या मागणीचे निवेदन शाहूनगर वासीयांच्या वतीने भाजपाच्या सातारा जिल्हा कायदा आघाडी जिल्हा संयोजक ॲड सचिन तिरोडकर यांनी आज सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये दिले.या मध्ये त्यांनी या भागांमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
कालच शाहूनगर हे भागांमध्ये बिबट्या येऊन गेल्याची खबर ताजी असल्याने पोलिसांची गस्त नसली तरी बिबट्याची गस्त शाहूनगर भागात सुरू आहे अशी खोचट प्रतिक्रिया एका नागरिकांनी दिली.
