महत्त्वाच्या बातम्या

शिंगणापूरमध्ये अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; २१ बाटल्या जप्त, एकावर गुन्हा

दहिवडी:
माण तालुक्यातील शिंगणापूर येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर देशी दारू विक्रीवर दहिवडी पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या कारवाईत देशी दारूच्या २१ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना शिंगणापूर गावाच्या हद्दीत एका व्यक्तीकडून विनापरवाना देशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली.

या कारवाईत ननेश पोपट जाधव (वय ४३, रा. शिंगणापूर, ता. माण, जि. सातारा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील पांढऱ्या रंगाच्या पिशवीत लपवून ठेवलेल्या ‘टांगो पंच‘ कंपनीच्या देशी दारूच्या २१ सीलबंद बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १ हजार ६८० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी एक बाटली रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आली आहे.

या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई महेश नाना सोनवलकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सातारा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एन. एस. खाडे करीत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!