महत्त्वाच्या बातम्या

शिक्षणाधिकारी यांनी घेतला विद्यार्थ्यांचा “क्लास” शिकवले गणित

    शिक्षणाधिकारी श्री संजय नाईकडे साहेब यांनी आज आळंदी भागातील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल मरकळ या शाळांना अचानक  भेटी दिल्या.एक भागिले एक गुणिले एक भागिले एक गुणिले शून्य या गणिताची  उकल  कशी काढावी?  व्हेअर डू यु लिव्ह? फादर आणि फादर्स यामधील फरक समजावून सांगितले.इंग्रजी कविता म्हणायला लावल्या विद्यार्थ्यांना शाळा आवडते का शिक्षक नीट शिकवतात का कोणता विषय आवडीचा आहे तुम्हाला किती दिवस सुट्टी असते? किती दिवस सुट्टी घ्यायला आवडेल? असे प्रश्न विचारून संवाद साधला.
इंग्रजी पुस्तकातील एका पानावरील चित्र वाचन घेतले, पुस्तकी ज्ञान महत्त्वाचे आहेच परंतु मैदान मैदानावरील खेळ यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवले पाहिजे असे सांगितले.
       अभ्यासाचा ताण न घेता अभ्यास केला पाहिजे, आनंददायी पद्धतीने शिकले पाहिजे, पोषक आहार घेतला पाहिजे. शिक्षकांनी पुस्तकी ज्ञाना सोबत व्यावहारिक ज्ञान दिले पाहिजे, मोबाईल चा अतिवापर टळला पाहिजे असे कानमंत्र दिले.इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम शाळांनी मराठी भाषेकडे लक्ष देत इंग्रजी सोबत मातृ भाषा मराठी सुध्दा  अधिक रंजकतेने शिकवावे. भाषेतील गद्य व पद्य यातील रसग्रहण करून भाषेतील आनंद घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!