शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांची नियोजन बैठक संपन्न
साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले हे आपल्या उमेदवारीचा अर्ज सोमवारी दि 28 ऑक्टोबर ला भरणार आहेत. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी प्रभाग १६ मधील कार्यकर्त्यांचा छोटेखानी मेळावा विसावा नाका येथील फर्निचर व्यावसायिक अरुण शेठ भोसले यांचा दुकानात पार पडला. यावेळी समस्त राजेभोसले परिवार उपस्थित होता.
सोमवारी सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ वाजता गांधी मैदान येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच आपल्या भागातील सर्व मतदारांनी मतदान केले पाहिजे याकडे सर्वांनी कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. अशा या बैठकीत सुचना देण्यात आल्या.
नियोजन बैठकीस सामाजिक कार्यकर्ते धनंजय खंदारे, सौ कुंदाताई खंदारे, सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, रवींद्र महाडिक व शिवाजी ढाणे उपस्थित होते.
