महत्त्वाच्या बातम्या

श्रीगणेश जयंतीनिमित्त मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते दौलतनगर येथील श्रीगणेश मंदिरात विधिवत पूजन संपन्न

    महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज श्रीगणेश जयंतीनिमित्त दौलतनगर-मरळी येथील श्री गणेश मंदिरात विधिवत पूजन केले. याप्रसंगी अतिशय चैतन्यपूर्ण आणि मंगलमय वातावरणात श्रीगणेशाची आरतीही संपन्न झाली. यावेळी सर्वांना उत्तम आयुरारोग्य आणि सुख-समृद्धी लाभो, अशी प्रार्थना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी श्री गणरायाचरणी केली. 

      यावेळी आदरणीय माँसाहेब विजयादेवी देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा), तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!