महत्त्वाच्या बातम्या

संभाजी महाराज स्मारकाचा १० कोटी निधी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग

     शिराळा येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर नियोजित छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठीचा मंजूर निधी सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग झाल्याबद्दल कार्यक्रम झाला. प्रारंभी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. या निमित्ताने बोलताना अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला मुघलांनी कैद केल्यानंतर औरंगजेबाकडे घेऊन जात असताना त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न शिराळ्यातील तोरणा भुईकोट किल्ल्यावर झाला. दुर्दैवाने त्यात यश आले नाही. या घटनेच्या स्मृती जतन करण्यासाठी मी लोकप्रतिनिधी असताना शासन दरबारी प्रयत्न करून अश्वारूढ पुतळ्यासह राजवाडा असलेले संभाजी महाराजांचे स्मारक मंजूर करून त्यास निधी मिळवला. या निधी पैकी सुमारे दहा कोटी रुपयांची रक्कम जिल्हाधिकारी यांचेकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे लवकरच स्मारक उभारणीस प्रारंभ होईल. या वेळी ‘विश्वास’ कारखाना संचालक विजयराव नलावडे, विश्वास कदम व यशवंत निकम, माजी जि. प. सदस्य महादेव कदम व प्रवीण शेटे, माजी सरपंच देवेंद्र पाटील व गजानन सोनटक्के, माजी प. स. सदस्य लालसो तंबीट, अजय जाधव, बंडा डांगे, उत्तम निकम, महेश पाटील, राजू निकम, संजय हिरवडेकर, अर्जुन कुरणे, एस. के. खबाले. संभाजी गायकवाड, प्रशांत देशमुख, प्रदीप यादव, अमित गायकवाड, सचिन यादव, अनिरुद्ध नलवडे, महादेव डांगे, बजरंग कदम, प्रताप मुळीक, संतोष लोहार, वाशीम मोमीन, गजानन पाटील, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्याकडे निधी वर्ग

 शिराळा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १० कोटींचा निधी जिल्हाधिकारी यांच्या प्रशासकीय खात्यात वर्ग केला असल्याची माहिती सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. चिखली (ता. शिराळा) येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.नाईक म्हणाले, विधानसभेच्या माझ्या कार्यकाळात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्याबैठकीत जिल्हास्तरीय समितीकडून शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी शासनास २० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. ४ जून २०२४ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत शासनाच्या शिखर समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत पहिल्या टप्प्यात १३ कोटी ४६ लाख ३९ हजार ६६४ रुपयांच्या आराखड्यास पवार यांनी प्रशासकीय मंजुरी दिली होती.

         नुकत्याच झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी स्मृती स्थळ विकास आराखड्याअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या कामांकरिता २०२४-२५ या वर्षात ९ कोटी ८५ लाख ८२ हजार रुपये निधी वितरित केला आहे. आता निविदा प्रक्रिया होऊन स्मारकाच्या कामाला गती मिळेल, उर्वरित कामासाठीही निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!