महत्त्वाच्या बातम्या

सकाळच्या शाळा साडेअकरा वाजेपर्यंतच सुरू ठेवा – चंद्रकांत जगदाळे 

     सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १५ मार्च पासून सकाळच्या सत्रात भरविल्या जात आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा या सकाळी साडे सात ते दुपारी साडेबारा या वेळेत भरत आहेत. वास्तविक पाहता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढला आहे. साधारण ११ वाजलेनंतर घराबाहेर पडलेल्या लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे.कडक उन्हामुळे दुपारी रस्त्यावर वाहतूक ही विरळ होत आहे.

अशातच जिल्हा परिषद शाळेची लहान मुले शाळा सुटल्यानंतर भर उन्हात घरी जाताना दिसत आहे.अनेक गरीब कुटुंबातील मुलांच्या पायात चप्पल सुद्धा नसते.त्यामुळे या मुलांना पाय पोळत घर गाठावे लागते.तसेच उन्हाच्या त्रासामुळे त्वचा व डोळे यांचे विकार तसेच उष्माघात होण्याची शक्यता वाढली आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा या सकाळी साडेसात ते साडे अकरा या वेळेत भरविण्याचे आदेश जिल्हा परिषदेने काढावेत अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्याकडे शाळा व्यवस्थापन समितीचे पांगरीचे अध्यक्ष चंद्रकांत जगदाळे,भरतेश गांधी, अण्णा कारंडे,अण्णासाहेब खरात तसेच विविध सामाजिक संघटना व पालकांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!