महत्त्वाच्या बातम्या

सख्ख्या दिरानेच केली घरातील सोन्याची चोरी 

   आंधळी (ता. माण ) येथील कमल तानाजी शेंडे यांच्या घरातील जवळपास दीड लाख किमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती. दहिवडी पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच तपास पूर्ण करत संशयितास अटक केली आहे.अटक केलेला संशयित हा फिर्यादीचा सक्खा दीर असल्याचे उघड झाले आहे.

    दि. २२ रोजी आंधळी( ता. माण )येथील कमल तानाजी शेंडे यांनी घरातील सुमारे दीड लाख किमतीचा सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेहल्याची गेल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात केली होती.सदर गुन्हा नोंद होताच दहिवडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे यांनी तपासाची चक्रे फिरवली व गुन्हातील आरोपीचा शोध घेतला, दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवत संशयित आरोपी रामचंद्र भुजाबा शेंडे (रा. शेंडेमळा आंधळी) यास अटक केली आहे. शेंडे याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून १,४८,०००/-किमतीची मोहनमाळ हस्तगत करण्यात आली.

      सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी,अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि दत्तात्रय दराडे,महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोठे स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, नितीन धुमाळ, लक्ष्मण कुचेकर यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!