महत्त्वाच्या बातम्या

सदरबाजार येथे उद्योग मेळावा संपन्न

 सातारा नगरपरिषद येथील प्रभाग सोळा मधील सामाजिक कार्यकर्ते श्री वैभव पोतदार यांनी योजना नगर महिला मंडळ प्रस्तुत उद्योग मेळाव्याचे आयोजन केले होते
सदर मेळावा सदर बाजार सातारा येथे आयोजित करण्यात आला होता
या मेळाव्याचे उद्घाटन प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर मृणालिनी होवाळ यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या अध्यक्ष भाषणात बोलताना त्यांनी सांगितले की महिलांनी आर्थिक सक्षम होण्याबरोबरच मानसिक सक्षम होणे खूप गरजेचे आहे व आताच्या धकाधकीच्या जीवनात आपले वैयक्तिक आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे महिलांना उद्योगधंद्यात सक्षम बनवून आपल्या स्वतःच्या पायावर उभे करणेहाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये महिलांनी साडी रांगोळी खाद्यपदार्थ दिवाळी कंदीलआयुर्वेदिक औषधे त्याचबरोबर घरगुती मसाल्यांचे स्टॉल लावले होते या मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला भविष्यात महिलांसाठीअनेक योजना राबवणार असून यामध्ये प्रामुख्याने महिलांचे आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर स्वसंरक्षणतसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती अशा बाबींचा समावेश असेल असे मंडळाच्या अध्यक्षासौ सुनीता पोद्दार यांनी सांगितले
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सदस्य ज्योतीलाहोटी स्वाती मजगावकर मिताली लाहोटी गौरी कुलकर्णी स्वप्नाली पोद्दार आरती गंगातीरकर व दिपा धोत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!