महत्त्वाच्या बातम्या

समीरबापू जाधव यांच्या धर्मवीर कुस्ती संकुलाचे भूमिपूजन; आता दहिवडीत घडणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल 

     लाल मातीतील रांगडी कुस्ती जतन करणारे पै. समीरबापू जाधव यांच्या डबरमळा (दहिवडी)येथील धर्मवीर कुस्ती संकुलाचे भूमिपूजन शिवसेना जिल्ह्याध्यक्ष चंद्रकांत जाधव,एकनाथ ओंबाळे,व महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.यावेळी , माजी जिल्हा परिषद सभापती भास्करराव गुंडगे, नगराध्यक्षा नीलम जाधव,प्रिया नलवडे,पै. ऍड सुरेश रुपनवर,वस्ताद संतोष दोरवड, नगरसेवक सयाजी मोरे,दिलीप जाधव, विजय जाधव,हणमंतराव गायकवाड,पै. गणेश कुंकूले, ऑल इंडिया चॅम्पियन विकास गुंडगे, राजाभाऊ गुंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी एकनाथ ओंबाळे म्हणाले समीर जाधव हा एक अतिशय सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता आहे मात्र सर्वसामान्यांसाठी काम करण्याची तळमळ आणि कामातील प्रामाणिकपणा हा अतिशय उल्लेखनीय आहे.समीर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी तालीम बांधण्याविषयीं जे स्वप्न पहिले होते ते पूर्ण होताना समीरबापूंना अनेक अडचनींना सामोरे जावे लागले मात्र त्यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा सोडला नाही आणि आज अखेर ते स्वप्न सत्यात उतरत आहे याचा मला मनस्वी खूप आनंद होत आहे. इथून पुढेही त्यांच्या प्रत्येक कामामध्ये आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी त्यांच्या पाठीशी खंबीरपने उभे आहोत. यावेळी मा. सभापती ऍड. भास्करराव गुंडगे, नगराध्यक्ष सौ.निलम जाधव, हणमंत गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व समीर जाधव यांना कामाबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लालासाहेब ढवाण यांनी केले तर समीर जाधव यांनी आभार मानले.

 

 आणखी 50 लाख निधी मिळवून देऊ -चंद्रकांत जाधव 

       आपले नेते मा. एकनाथरावजी शिंदे साहेब सध्या उपमुख्यमंत्री असून नगरविकास खाते त्यांच्याकडे आहे त्यामुळे धर्मवीर कुस्ती संकुलास २५ लाख निधी उपलब्ध करून देता आला. सुदैवाने धर्मवीर कुस्ती संकुल दहिवडी नगरपंचायत अंतर्गत येत आहे त्यामुळे इमारत आणखी भव्य आणि प्रशस्त व्हावी यासाठी आणखी ५० लाख रुपयापर्यंत निधी उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असा शब्द शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी बोलताना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!