महत्त्वाच्या बातम्या

समृद्ध ग्राम चळवळीत माजी विद्यार्थ्यांची उडी; बिदाल येथे 1984 च्या दहावीच्या बॅचने केले  गाव चका चक

दहिवडी: महाराष्ट्र मध्ये सप्टेंबर महिन्यापासून 31 डिसेंबर पर्यंत समृद्ध ग्राम अभियान सुरू आहे यामध्ये बिदाल गावाने सहभाग नोंदविला असून बक्षीस घेण्याच्या दृष्टीने कामाची आखणी केली आहे.  या अभियानाला हातभार लावण्यासाठी आणि लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी येथील नवमहाराष्ट्र विद्यामंदिर 1984 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदर च्या निमित्ताने एकत्र येऊन गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली काही तासातच गाव चकाचक केले. या उपक्रमाला ग्रामपंचायतीसह नागरिकांनीही उस्फुर्त प्रतिसाद दिला.

       या बॅचचे माजी उपयुक्त आदिवासी विभाग भगवानराव जगदाळे, माजी पोलीस अधीक्षक शोभा पिसे सहायक पोलीस निरीक्षक सुदाम चिरमे, मच्छिंद्र गोरे, प्राध्यापक अनिल माने उद्योजक आप्पासाहेब जगदाळे, अंकुश मलकमिर संजय बोराटे, सुनंदा काटकर नंदा पाटील, सुवर्णा राजे घाडगे बाळासाहेब मदने, राजेंद्र जगदाळे हे विविध क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी गावासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आहे शाळेकडे पाहत असताना शाळा डिजिटल करण्यासाठी कॉम्प्युटर संच,उपयोगी साहित्य भेट दिले आहे. गाव नेहमी पुढे जावे यासाठी नेहमी मदत करणारी ही बॅच ओळखली जाते आजही त्यांनी गावासाठी श्रमदान करून इतरांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे .त्यानंतर शिक्षक व बालपणीचे मित्र यांच्यामध्ये स्नेह मेळावा झाला यामध्ये अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला वर्ग मैत्रीण सुजाता कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाले यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

      एकमेकांच्या मुलांची विचारपूस केली कुटुंबाला आधार देत असतानाच शाळा गाव याबद्दल आपुलकीची भावना व्यक्त केली. नोकरीमध्ये योगदान देऊन निवृत्त झाले व ज्यांना प्रमोशन मिळाले अशा सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!