महत्त्वाच्या बातम्या

सरकार कॅम्पसच्या दोन युवा सदस्यांचा वृक्षरोपणाचा एक अनोखा उपक्रम.

       सरकार कॅम्पस महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून विविध उप्रकम राबवले जातात. यामध्ये रक्तदान शिबिर तसेच गरीब व गरजू लोकांना अन्नदान व हिवाळ्यामध्ये ब्लँकेट व स्वेटर वाटप असे विविध कार्यक्रम सरकार कॅम्पस चे संस्थापक अध्यक्ष श्री चंदन शिंदे भाऊ सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातात. असाच निसर्गाचा होणारा ऱ्हास व सद्या घातक असा होणारा हवामानातील बदल पाहून सरकार कॅम्पस चे सदस्य श्री. सुजीत सोनवणे व श्री. श्रीतेज महामुनी यांनी वृक्षरोपण करण्याचा निर्धार केला. साताऱ्याचे आराध्य दैवत असणारे श्री. पेढ्याचा भैरोबा यांना साक्षी ठेवून सुजीत व श्रीतेज यांनी त्याच परिसरात वृक्षरोपणास सुरुवात केली. त्यांनी आपल्या मातीसाठी पूरक व ज्या वृक्षांमध्ये आयुर्वेदीक गुणधर्म आहेत अशा शंभर वृक्षांचे रोपण केले. पण काही समाजकंटक वृत्तीच्या लोकांनी काही वृक्षांची नासधूस केली पण या गोष्टींना न डगमगता राहिलेल्या वृक्षांची जोपासणा करण्याचे काम सूजीत व श्रीतेज हे करत आहेत.

        पुढील काळात दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प सुद्धा त्यांनी केला आहे. सुजीत व श्रीतेज यांच्या या कामाची दखल घेऊन सरकार कॅम्पस चे संस्थापक अध्यक्ष श्री चंदन भाऊ शिंदे सरकार व शुभम भैय्या घाडगे यांनी त्यांचे कौतूक केले व पुढील काळात त्यांना या कामासाठी वृक्षरोपणा साठी लागणारी जी काही मदत असेल ती मदत करण्याचा शब्द ही त्यांनी दिला. समाजासाठी, निसर्गासाठी झटणारे सुजीत व श्रीतेज यांच्या सारखे युवक तयार करण्याचे काम सरकार कॅम्पस च्या माध्यमातून केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!