महत्त्वाच्या बातम्या

सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल लिंब येथे कौशल्य शिक्षण जनजागृती कार्यक्रम संपन्न

     दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी जय भवानी शिक्षण संस्थेच्या सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल लिंब या  शाळेमध्ये जय भवानी शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय रवींद्र शांताराम कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ रोहिणी साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली लेंड अ हॅन्ड  इंडिया या संस्थेच्या माध्यमातून कौशल्य शिक्षण या विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. 
    नवीन शैक्षणिक धोरण(NEP) 2020 व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित कौशल्य शिक्षणाचे महत्त्व, व्याप्ती व अंमलबजावणी बाबत चर्चासत्र कार्यक्रम घेण्यात आला. 
लेंड अ  हॅन्ड इंडिया ही ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करणारी स्वयंसेवी संस्था असून 2006 पासून महाराष्ट्रासह 25 राज्यांमध्ये नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य शिक्षणाचा प्रसार व प्रचाराचे काम करते आहे. लेंड अ हॅन्ड इंडिया (लाही) संस्थेचे प्रतिनिधी श्री मयूर लाड व श्रीमती मेधा बनकर यांनी शाळेला भेट दिली. श्री मयूर लाड यांनी कौशल्य शिक्षण आधारित गीते, भाषण, नृत्य यांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून मनोरंजक पद्धतीने कौशल्य शिक्षण या विषयांचे महत्त्व, स्वरूप आणि कौशल्य शिक्षणाचा हेतू व उद्देश्य याची मांडणी करून शाळेमध्ये जनजागृती केली. तसेच काही प्रतिनिधी श्रीमती मेधा बनकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा यांच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून इयत्ता सहावी ते दहावी साठी नवीन अभ्यासक्रम या संदर्भात बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. 
    पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील व्होकेशनल बदलाच्या सूचनांची अंमलबजावणी करणे, कौशल्य आधारित शिक्षण रुजवणे, विद्यार्थ्यांना कृतीवर आधारित शिक्षणातून विषय सोपे करून समजावणे, दैनंदिन जीवन आणि पाठ्यक्रमातील सहसंबंध यांच्यातील परस्पर पूरक संबंध समजण्यास मदत होते. 
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षका सौ तृप्ती सावंत यांनी केले. शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष श्री संदीप खताळ यांनी हा कार्यक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्याबद्दल संस्थेचे तसेच शाळेचे आभार मानले व शाळा नवनवीन उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग घेत असते याबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कोंढवली गावच्या सरपंच माननीय सौ सुरेखा शिवाजी जंगम यांनी कौशल्य शिक्षणाचे महत्त्व मुलांना सांगून त्यांचे मार्गदर्शन केले तसेच शाळेचे व मुलांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पालक व ग्रामस्थांनी भरपूर प्रमाणात उपस्थिती दर्शवली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!