महत्त्वाच्या बातम्या

सराईत गुन्हेगारांकडून जिवंत काडतूसे व पिस्तूल केले हस्तगत

     पुण्यात सराईत गुन्हेगारांचे प्रमाण वाढले असून दिवसेंदिवस विनापरवाना शस्त्र जवळ ठेवणाऱ्या अनेकांवर पुणे गुन्हे  शाखेने गुन्हा दाखल केला आहे. वाघोली घटनेनंतर आता खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखा, पुणे शहर हे दि. 8 नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कॉबिंग ऑपरेशन दरम्यान पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व प्रशांत शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, रेकॉर्डवरील गुन्हेगार चैतन्य बैरागी हा निलायम ओव्हर ब्रीज जवळ उभा असून त्याच्याजवळ पिस्तुल आहे. ही बातमी मिळताच  पोलीस पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. चैतन्य बैरागी व त्याच्यासोबतचा एक तरुण मोहम्मद ऑटो गॅरेज निलायम ब्रिज जवळ फुटपाथ वर थांबल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी या दोघांनाही  ताब्यात घेतले.

     चैतन्य संतोष बैरागी (वय 23 वर्ष) राहणार लक्ष्मी नगर पर्वती, पुणे तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव ऋषिकेश फुलचंद रवेलिया (वय 22 वर्ष) राहणार लेन नंबर 4 साठे वस्ती लोहगाव पुणे असे आहे. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर चैतन्य बैरागी याची झडती घेतली. यामध्ये त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काढतोस मिळाले पोलिसांनी ते जप्त केले आहे. याबाबत पर्वती पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 3(5) तसेच 37(1)135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा अधिक तपास केला असता चैतन्य बैरागी याच्यावर फरासखाना पोलीस स्टेशन व पर्वती पोलीस स्टेशन येथे एकूण दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ऋषिकेश रवेलीया याच्यावर मोका सारखे गंभीर गुन्हे दाखल असून फरासखाना पोलीस स्टेशन व विमानतळ पोलिस स्टेशन येथे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.

        ही कामगिरी पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर, पंकज देशमुख, मा. पोलीस उपायुक्त गुन्हे, पुणे शहर, निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 पुणे शहर, राजेंद्र मुळीक, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहर कडील मा.पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे, अमोल राऊत, रवींद्र रोकडे, अमोल घावटे, अनिल कुसाळकर, पवन भोसले, गणेश खरात, प्रशांत शिंदे, आझाद पाटील, शेखर खराडे, चेतन आपटे व किरण पड्याळ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!