महत्त्वाच्या बातम्या

सराईत गुन्हेगारांना पोलीस कोठडी ; 32 हजरांचा मुद्देमाल जप्त

     पुण्यात सराईत गुन्हेगारांचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी चोरी, लूटमार अशा घटना पाहायला मिळत आहेत. अशातच पुण्यातील बंड गार्डन पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून त दरोड्यांची साधने आणि चोरीचे सहा मोबाईल फोन जप्त असा एकूण किंमत ३२,१६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या आदेशानुसार, धीरज गुप्ता यांच्यासह शोध पथकाचे अधिकारी गुन्हे प्रतिबंधक गस्तीवर होते.  पुण्यातील मालधक्का चौकातील जुन्या रेल्वे सिमेंट गोदामाजवळ दरोडा टाकण्यासाठी काही लोक थांबले आहेत. अशी बातमी लागताच  पथकाने त्यांच्यावर छापा टाकला. जानमोहम्मद नसरुद्दीन शेख (३२, रा. पीर वस्ती, वडकी), सतीश ज्ञानेश्वर शिरोळे (३५, रा. पुणे स्टेशन परिसरातील; मूळचा दहितणे, तालुका दौंड), शिव प्रकाश कुमार (२३, रा. स्वारगेट कालवा, पुणे) या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून दरोड्याच्या साहित्यासह सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

       ही संपूर्ण कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र बनसोडे, उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक आयुक्त संगीता शिंदे अल्फोन्सो, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) नीलकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!