महत्त्वाच्या बातम्या

सराईत गुन्हेगाराकडून 70 हजरांचा मुद्देमाल जप्त; बंड गार्डन पोलिसांची कारवाई

पुण्यात सराईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून बंड गार्डन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने उत्तम कामगिरी करत सराईत आरोपी कडून तब्बल 70, 000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
   मिळालेल्या माहितीनुसार रविशंकर बंडप्पा खुबा (वय 31 वर्ष) हे ड्रायवर असून ते कात्रज येथील जैन मंदिराजवळ राहतात.  रविशंकर हे शिंदे वाहनतळा कडून कात्रज बस स्टॉप कडे चालत येत असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून नेला. सदर घटनेची फिर्यादी यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती. यावरून अज्ञातावर  जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद केलेला गुन्हा लवकरात लवकर उघडकीस यावा यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, बंड गार्डन यांनी पोलीस अंमलदार व तपास पथकाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी बंड गार्डनचे पोलीस अंमलदार व तपास पथकाचे अधिकारी हे पेट्रोलिंग करत होते. फिर्यादीने पोलिसांना आरोपीचे वर्णन दिले होते. सदर वर्णनाप्रमाणे पोलिसांना एक व्यक्ती विना नं प्लेट दुचाकीवरून जाताना दिसला. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले व त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली.    गुन्हाच्या तपासादरम्यान आरोपीने राजगड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण, स्वारगेट पोलीस ठाणे व बंड गार्डन पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीला 3 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली असून 6 तारखे पर्यंत कस्टडी सुनावली आहे. आरोपीकडून चोरी केलेले 2 मोबाईल व एक मोटार सायकल असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अर्जुन हिराजी भोसले (वय 23) राहणार अप्पर इंदिरानगर, पुणे असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर पुणे शहरातील विविध ठिकाणी नऊ गुन्हे दाखल आहेत.
    सदर कामगिरी मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त मा. राजेंद्र बनसोडे, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री मिलिंद मोहिते, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2  मा संगीता अल्फान्सो शिंदे, सो साहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग, मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे निळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता,  गणेश चव्हाण, मोहन काळे, पोलीस आमदार प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनीष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब भांगरे, तुकाराम हिवळे, यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!