सातारा जिल्हा न्यायालयासमोर चारचाकीला अपघात
सातारा येथील जिल्हा न्यायालयासमोरआज संध्याकाळी नऊ वाजता होंडा सिटी क्रमांक MH 10 CA 9990 व होंडा सिटी MH 12 DM 5466 यांची जोरदार धडक झाली.यामध्ये दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून कोणीही जखमी झाले नाही. सांगली येथील किरण कलकुटगी आपल्या होंडा सिटी वाहनाने साताऱ्यातील विवाह सोहळा संपन्न करून सांगलीकडे जाण्यास निघाले असता जिल्हा न्यायालय समोर रस्ता चुकल्याचे निदर्शनास येताच त्यांनी वाहन वळवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी बॉम्बे रेस्टॉरंट कडून पोवई नाक्याकडे जाणाऱ्या कारने त्यांच्या गाडीस जोरदार धडक दिली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली.
सदर घटनेची खबर सातारा वाहतूक शाखेस कळताच वाहतूक शाखेचे सपोनी यादव त्यांच्या कर्मचाऱ्यां सोबत तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने बाजूस करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. त्याचबरोबर सदर घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या अपघात विभागास देण्यात आली. सातारा शहर पोलीस स्टेशन अपघात विभागाचे करळे घटनास्थळी तत्काळ रवाना झाले.
सदर घटनेचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. सातारा वहातूक शाखेचे सपोनी यादव पोलीस हवालदार इंगुळकर पोलीस हवालदार कोळेकर संतोष त्रिंबके तसेच पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.
