सातारा जिल्ह्यातील युवकाची ऑनलाईन फसवणूक….तब्बल 13 लाखांचा घातला गंडा
शिरवळ- खाजगी कंपनीत सुरक्षा अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या पंकज चव्हाण यांना ऑनलाईन फसवणुकीद्वारे 13 लाख39 हजार 770 रुपयांचा गंडा घातला आहे.पंकज चव्हाण हे पळशी येथील रहिवासी आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावून सायबर चोरट्यांनी त्याची फसवणूक केली. पंकज महादेव चव्हाण असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. मोबाईलवर 25 फेब्रुवारी ते 31 जुलै या दरम्यान व्हिडिओ माध्यमातून गुंतवणूक संबंधी ॲप ची माहिती मिळाली होती. या ॲपमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवलेल्या रकमेवर दररोज एक टक्के रक्कम मिळणार आहे असे दर्शवले गेले होते.त्यानंतर पंकज चव्हाण यांनी प्ले स्टोअर वरून ॲप डाऊनलोड करून संबंधित कागदपत्रांची पूर्तता केली व क्रेडिट कार्डच्या मदतीने 13 लाख 39 हजार 770 रुपये गुंतवले.12 ऑगस्ट रोजी त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतु पैसे निघाले नाहीत. व प्ले स्टोर वर ते ॲप दिसत नसल्याने त्यांची ऑनलाइन फसवणूक केली आहे असे लक्षात आले व त्यांनी सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल केली.
