सातारा शहर परिसरात नियमांचे उल्लंघन; वाढदिवस साजरे करण्यासाठी रात्री 12 नंतरही फाटक्यांची आतिषबाजी
सातारा शहर परिसरात सध्या दररोज रात्री १२ वाजता फटाके फोडून वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने गंभीर पावले उचलणे गरजेचे आहे. रात्री १० नंतर फटाके वाजवणे कायद्याने बंदी असताना सदर नियम धाब्यावर बसून रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करण्याचा ट्रेंड पुन्हा जोर धरू पाहत आहे. परीसराची शांतता भंग पावून मोकाट जनावरे विशेषतः भटकी कुत्री जोरजोराने भुंकण्यास सुरुवात करतात किंवा सैरावैरा धावण्यास सुरुवात करतात ज्यामुळे दुचाकी चा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या काही वर्षांपूर्वी तलवारीने केक कापण्याची घातक पद्धत महाराष्ट्र पोलिसांनी समूळ उखडून टाकली आहे त्याचप्रमाणे सातारा पोलीस प्रशासनाने या संदर्भात परिपत्रक काढून या घटनेस आळा घालणे अत्यंत जरूरी आहे.
