साताऱ्याचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे बॉम्बे रेस्टॉरंट येथे जल्लोषात स्वागत
सातारा जिल्हाच्या पालकमंत्री पदी दुसऱ्यांदा वर्णी लागलेले ना शंभूराज देसाई यांचे प्रथमच सातारा शहरात आगमन होत असल्याने सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेले बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार शंभूराज देसाई यांचे औक्षण केले. तदनंतर जेसीबी द्वारे मोठा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण रस्त्यावर शिवसेना शिंदे गटाच्या व युवासेना पदाधिकाऱ्यांचे भले मोठे बॅनर लावले होते.
पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवतीर्थावर सुरू असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाचे सुरू असलेल्या कामाची ते पाहणी करणार आहेत. प्रचंड गर्दीच्या अनुषंगाने शहर पोलीस ठाण्याच्या वतीने व सातारा वहातूक शाखेच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
