सामाजिक स्वास्थ्यासाठी महिलांनी पूर्ण क्षमतेने व सक्षमपणे कार्य करणे आवश्यक- पोलीस निरीक्षक संदेश केंजळे
पुणे: द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य दर वर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजकीय,सामाजिक,धार्मिक,क्रीडा, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना नारीशक्ति पुरस्काराने सन्मानित करते. या वर्षी राजकीय, सामाजिक,धार्मिक,क्रीडा, व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ४७ महिलांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच नवनियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा प्रा.निर्मला संकपाळ होत्या. कार्यक्रमाला द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अन्सार शेख, राज्य संपर्कप्रमुख बाळासाहेब कोठुळे, घोडनदी बार वकील संघटना उपाध्यक्षा ॲड.वर्षा सोनकांबळे,पुणेकर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.जितेंद्रकुमार थिटे, ,सावित्रीबाई महिला प्रतिष्ठान संस्थापिका कांताताई पांढरे,प्र जापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय अर्चना दीदी, द युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा अध्यक्ष शकील मणियार तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्य महिला भगिनी व द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा पदाधिकारी, पुणे शहर प्रमुख अनिल गवळी, जिल्हा खजिनदार दत्ता नेटके तसेच तालुका अध्यक्ष विजय कांबळे उपाध्यक्ष विश्वनाथ घोडके उपाध्यक्ष भरत घावटे , सचिव साहेबराव चव्हाण, संपर्कप्रमुख चेतन पडवळ, कोषाध्यक्ष योगेश पाचंगे, खजिनदार सुनील काटे, सल्लागार नितीन मिसाळ, सदस्य पावलस गवई , सदस्य राम कांबळे जुन्नर तालुका उपाध्यक्ष जयेश खांडगे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंजळे पुढे म्हणाले की, सुसंस्कृत,चारित्र्यसंपन्न समाज निर्मितीसाठी उपस्थित महिला विविध क्षेत्रात करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे. राज्य अध्यक्ष अन्सार शेख यांनी उपस्थित महिलांच्या कार्याचा गौरव करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. निर्मला संकपाळ म्हणाल्या की आपल्या देशाला कर्तुत्ववान महिलांचा इतिहास आहे. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संतोष क्षीरसागर तर आभार राज्य संपर्कप्रमुख बाळासाहेब कौठळे यांनी मानले.
