महत्त्वाच्या बातम्या

सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा

     स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधींविरोधात पुण्यात मानहानीचा खटला दाखल होता. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे.राहुल गांधी यांनी 2023 मध्ये सावरकरांविषयी काही वादग्रस्त वक्तव्य केलं होतंयापूर्वी न्यायालयाने राहुल गांधींना २५,००० रुपयांच्या जामिनावर सोडले होते.
         त्यांच्या वकिलांनी कोर्टात अर्ज केला की, सतत हजर राहण्याची त्यांना गरज नसावी. पुण्यातील न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला आणि त्यांना सुनावणीसाठी हजर राहण्यापासून कायमची सूट दिली.
राहुल गांधी आता या खटल्याच्या प्रत्येक सुनावणीसाठी स्वतः न्यायालयात येणार नाहीत. पुढील सुनावणी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!