महत्त्वाच्या बातम्या

सेवा ही संघटन !

 

 

“राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” हा भाजप परिवाराचा विचार आहे. ‘सशक्त भारत’ भारत बनवायचा असेल, तर त्यासाठी आधी ‘सशक्त भाजप’ हे ध्येय सत्यात उतरवले पाहिजे. यासाठीच यावेळी सुमारे दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पक्षाने आपल्या सर्वांसमोर ठेवले आहे. 

 

भाजपच्या संघटन पर्व कार्यक्रमाअंतर्गत सातारा जिल्हा भाजपने आयोजित केलेल्या सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नामदार जयकुमार गोरे भाऊ, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, प्रदेश सचिव भरत पाटील,सुनील काटकर तात्या,रामकृष्ण वेताळ,प्रियाताई शिंदे, कविताताई कचरे, चित्रलेखाताई माने कदम, सातारा मंडल अध्यक्ष विकास गोसावी, सदस्यता नोंदणी अभियान जिल्हा संयोजक विठ्ठल बलशेटवार,युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी,सर्व सरचिटणीस, मंडल अध्यक्ष, सर्व जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे उपस्थितीत सदस्यता नोंदणी कार्यशाळा संपन्न झाली.

  या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भारतीय जनता पार्टी च्या प्रत्येक कार्यकर्त्याने सदस्यता नोंदणी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन सदस्यता नोंदणी करावी असे आवाहन केले. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्ष व आम्ही खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.यावेळेस जिल्हात धैर्यशील कदम यांचे नेतृत्वात आम्ही भाजपा चे 4 आमदार निवडून आलो आहोत आणि महायुतीचे 8 आमदार त्यांच्या नेतृत्वात निवडून आले आहेत धैर्यशील दादा तुम्हीं नशीबवान अध्यक्ष आहात असे कौतुक मंत्री महोदयांनी अध्यक्षांचे केले.यावेळेस मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी अटलजींच्या आठवणीना उजाळा देत श्रध्येय अटलजींना अभिवादन केले.त्याचप्रमाणे ज्या ज्या भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांचे पक्ष वाढीसाठी योगदान दिलेले आहे त्यांना जिल्हापरिषद, नगरपालिका निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा करून केवळ तालुका जिल्हाच नव्हे तर राज्य पातळीवरील विविध शासकीय समित्या, महामंडळे यांचेवर प्रधान्याने नियुकी करणार असल्याचा विश्वास मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्याच पद्धतीने जिल्हातील सर्वच भाजपा मंडल अध्यक्ष, विविध पदाधिकारी यांचा सन्मान ठेवला जाईल. त्यांनी सुचवलेल्या विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल. त्यांचेसाठी जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार महिन्यातून एकदा जनता दरबार भरवला जाईल. भाजपा कार्यकर्त्यांनी सातारा, मुंबई कुठेही बिनदिक्कत माझ्याकडे यावे. असा विश्वास नामदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला.

 भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपल्या कामाच रिपोर्ट कार्ड पक्ष ठेवत असतो असे प्रतिपादन नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी केले. एका रेशन दुकानदाराच्या मुलाला मंत्री फक्त भारतीय जनता पार्टीचं करू शकते हे भारतीय जनता पार्टीने मला मंत्री करुण दाखवून दिले मी पक्षाचा ऋणी आहे असे नामदार जयकुमार गोरे भाऊ म्हणाले. याच वेळी जयकुमार भाऊंनी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा तुम्हीं खरोखर भाग्यशाली जिल्हाध्यक्ष आहात असे कौतुक केले.यावेळेस मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी श्रध्येय अटलजींच्या आठवणीना उजाळा दिला व श्रध्येय अटलजींना अभिवादन केले.

 यावेळेस दोन्ही मंत्री महोदय यांचा भाजपा सातारा जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच जिल्ह्याला यश मिळवून देणारे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचा सत्कार करण्यात आला.

  जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा कदम यांनी जिल्ह्यात मिळालेल्या विजयाचे श्रेय सर्व कार्यकर्त्यांना देत कार्यकर्त्यांचा गौरव केला. मी जिल्हाध्यक्ष आहे पण खरं काम तुम्हीं पदाधिकाऱ्यांनी केल तुम्हीं मला साथ दिली म्हणून हे शक्य झाले. आपण पक्षाचे प्रत्येक कार्यक्रम ताकतीने राबवतो तसे सदस्यता नोंदणी अभियान हा कार्यक्रम प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी ताकतीने राबवून जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचं 1 नंबर ची पार्टी असल्याच दाखवून देऊया असे आवाहन केले.

  यावेळेस मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अभिनंदनाचा ठराव adv. प्रशांत खामकर यांनी मांडला तरी सिद्धी पवार यांनी अनुमोदन दिले. सर्वसंमतीने अभिनंदनाचा ठराव मंजूर झाला.

  सदस्यता नोंदणी अभियान संयोजक विठ्ठल बलशेठवार यांनी अभियानाची विस्तृत माहिती देऊन मार्गदर्शन केले. 

  आज देशाचे माजी पंतप्रधान स्व. श्रध्येय अटलबिहारीजी वाजपेयी यांची 100 वी जयंती यनिमित्त सर्व मान्यवरांनी अटलजी यांना अभिवादन केले.

 जिल्हा सरचिटणीस संतोषजी कणसे यांनी अटलजी यांच्या कविता गायन करुण अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला.

 सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर सरचिटणीस विकल्प शहा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.यावेळेस जिल्हा पदाधिकारी मंडल पदाधिकारी सदस्यता नोंदणी अभियान संयोजक, सहसंयोजक आणि पदाधिकारी उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!