महत्त्वाच्या बातम्या

स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांची मोठी घोषणा : मराठा समाजाला ५०% मधूनच आरक्षण देणार !

     स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अंकुश कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेमध्ये बोलताना मराठा समाजाला ५०% मधून आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. सगळेच पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मकता दर्शवतात मात्र ५०% मधून आरक्षण देण्याबाबत कोणताही नेता व राजकीय पक्ष स्पष्ट व ठोस भूमिका घेत नाही. ५०% च्या आतून आरक्षण देण्याचा विषय आला की सगळेच मूग गिळून गप्प बसतात. यावर टिप्पणी करत स्वराज्य पक्ष मराठा समाजाला ५०% मधूनच आरक्षण देईल अशी मोठी घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. 

छत्रपती म्हणून अठरापगड जाती व बारा बलुतेदारांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, या सर्वांसह मराठा समजालाही हक्काचा न्याय मिळवून देईन, अशी भूमिका छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!